उपक्रम-१, Date: 2025-03-25
गच्चीवरील बागकामासाठी मोठ्या आकाराचे रिसायकल केलेल्या प्लास्टिकचे वाफे आणि ते ठेवण्यासाठी लोखंडी आधाराची चौकट असे बनविण्याचा उपक्रम.
उपक्रम-२ ए अं आ अं , Date: 2023-11-09
पाच वर्षांपासून अंजीराचा पाठपुरावा सुरु झाला. आजपर्यंत सहा प्रजाती जमा केल्यात. त्यातल्या तीन भारतात प्रथमच नेल्यात. फिलाडेल्फियात मिळालेलं सलेस्ट भारतात छान वाढतंय. कल्पना अशी आहे की प्रत्येक घर सोसायटी बंगल्याच्या आवारात एक तरी सलेस्ट असलं पाहिजे. एक अंजीर आपल्या अंगणी.
उपक्रम-३ बीजपाल., Date: 2020-12-02
देशी बी बियाणे मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. देशी बियाणांना कुणी वाली नाही. जनतेनेच पुढाकार घेऊन देशी बियाणांचे पालकत्व घेऊन त्यांचा सांभाळ करावा असे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
उपक्रम-४ कार्टून ऍनिमेशन स्टुडिओ / नवनिर्मिती केंद्र , Date: 2025-02-09
नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची जागा. रेकॉर्डिंग स्टुडिओ. ऍनिमेशन स्टुडिओ. व्हिडीओ रेकॉर्डिंग स्टुडिओ. वाचनालय. रिसर्च सेंटर. परसबाग.